सुपरफास्ट बातमी

public issue: स्मशानभूमी दुरुस्तीबाबत खासदार निलेश लंके यांना निवेदन

नगर तालुका | प्रतिनिधी

public issue: नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पावसाळ्यात येथे अंत्यविधी करणे अत्यंत कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांच्यासमवेत खासदार डॉ. निलेश लंके यांना निवेदन सादर करून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

स्मशानभूमीतील समस्यांचा पाढा

  • जीर्ण झालेला पत्र्याचा शेड – पावसात गळती
  • बसण्यासाठी जागा नाही
  • लाईटची आणि पाण्याची सोय नाही
  • दशक्रियेसाठी ओटे किंवा शेड नाहीत
  • प्रवेशद्वार नाही, परिसर अस्वच्छ

निवेदनातील मागण्या

  1. नवीन पत्र्याचे शेड
  2. लाईटची व पाण्याची सुविधा
  3. दशक्रिया विधीसाठी ओटे व शेड
  4. प्रवेशासाठी गेट व पेव्हिंग ब्लॉक
  5. देखभाल व स्वच्छतेसाठी स्थायी निधी
public issue, स्मशानभूमी,
निवेदन देताना ग्रामस्थ
सागर चाबुकस्वार यांचे मत

मृत्यू ही अपरिहार्य गोष्ट आहे. शेवटच्या प्रवासात तरी माणसाला सन्मान मिळावा, ही मूलभूत अपेक्षा असते. पण येथे मात्र शोकांत प्रसंगीही नागरिकांना दुःखद अनुभवांना सामोरे जावे लागत आहे, ही व्यवस्थेची शोकांतिका आहे. आम्ही ही मागणी राजकीय हेतूने करत नाही, तर माणुसकीच्या भावनेतून हा विषय हाताळत आहोत.

ग्रामस्थांचा इशारा

प्रशासनाने पुढील १५ दिवसांत या कामांना सुरुवात न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मंडपातच अंत्यविधी करण्यात येतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

 

Exit mobile version