Public issue: 17 जुलैला होणाऱ्या ‘कुत्रे सोडू आंदोलना’ला पोलिस बंदोबस्ताची मागणी

Photo of author

By Dipak Shirsath

Public issue, कुत्रे सोडू आंदोलन

अहमदनगर | प्रतिनिधी

public issue: मुकुंदनगर व फकीरवाडा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्रेक झालेल्या नागरिकांनी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन देत येत्या गुरुवारी, १७ जुलै रोजी आयुक्तांच्या दालनात ‘कुत्रे सोडू आंदोलन’ छेडण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनपा कर्मचारी व कुत्रे पकडणाऱ्या ठेकेदारांकडून आंदोलकांवर किंवा कुत्र्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आंदोलनाला पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय व तोफखाना पोलीस ठाण्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच महिलांवर व वृद्धांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मुकुंदनगर परिसरात अनेकांना कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना घडत असून नागरिक भयभीत झाले आहेत.

Public issue, कुत्रे सोडू आंदोलन

 

महानगरपालिकेने वेळेत कारवाई न केल्यास कुत्रे सोडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलनावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिक, कर्मचारी व मुक्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

Leave a Comment