सुपरफास्ट बातमी

Maharashtra Sports: राज्य तायक्वांदो स्पर्धेत स्नेहा शिंदेला कास्यपदक; 39 किलो वजन गटात तिसरा क्रमांक

Maharashtra Sports, तायक्वांदो,

अहमदनगर | प्रतिनिधी

Maharashtra Sports: नाशिक येथे झालेल्या राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत अहिल्यानगरच्या आयडियल तायक्वांदोची खेळाडू स्नेहा सचिन शिंदे हिने 39 किलो वजन गटामध्ये कास्यपदक पटकावले. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळवला आहे.

स्नेहा गेल्या तीन वर्षांपासून आनंद विद्यालय, गुलमोहर रोड येथे प्रशिक्षक अमोल काजळे आणि रोहित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ती सावेडी येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थिनी असून सेंट मोनिका डी.एड. कॉलेजचे प्राध्यापक सचिन शिंदे यांची कन्या आहे.

या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, तायक्वांदोचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा उपाध्यक्ष संतोष लांडे, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव घनश्‍याम सानप, खजिनदार धर्मनाथ घोरपडे, सहसचिव गणेश वंजारे आदींनी स्नेहाचे अभिनंदन केले आहे.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Exit mobile version