kolhapur mahadevi elephant: अखेर वनतारा ची नरमाई; कोल्हापूरकरांचा विजय महादेवी हत्तीणी परत नांदणी मठात

Photo of author

By Dipak Shirsath

kolhapur mahadevi elephant, वनतारा

कोल्हापूर | प्रतिनिधी 

kolhapur mahadevi elephant: कोल्हापूरकरांच्या भावना आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनतारा आणि नांदणी मठातील बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला लवकरच पुन्हा कोल्हापुरात आणले जाणार आहे. कोल्हापूरकरांचा हा मोठा विजय मानला जात आहे.

वनताराचे सीईओ विहान कर्णीक आणि मठाधिपती यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. गेल्या काही आठवड्यांपासून या विषयावर कोल्हापुरात आंदोलनाचं वातावरण होतं. महादेवीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढण्यात आली होती. तसेच रिलायन्स आणि जिओच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात आला होता.
या जनआंदोलनानंतर वनताराकडून सार्वजनिक माफी मागण्यात आली. त्यानंतर जैन बोर्डिंग येथे आयोजित बैठकीत वनतारा, नांदणी मठ, स्थानिक लोकप्रतिनिधी, आणि राजू शेट्टी उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वनताराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की,

नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. महादेवीसाठी नांदणी मठात उत्तम व्यवस्था केली जाईल. कोल्हापूरकरांचा रोष आम्ही समजून घेतला आहे. अनंत अंबानी यांचीही इच्छा होती की कुणालाही दुखावले जाऊ नये.

महादेवी हत्तीणीची वनतारामधील पाठवणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झाली होती. मात्र तिच्या जाण्याच्या दिवशी कोल्हापूरकरांसोबत हत्तीणीच्या डोळ्यांतही अश्रू होते. अखेर नागरिकांच्या भावना, सामाजिक दबाव आणि न्यायाची गरज यामुळे तिच्या पुनर्प्रत्यागमनाचा निर्णय झाला आहे.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Leave a Comment