सुपरफास्ट बातमी

Grampanchayat karmachari: प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत मोर्चा; 8 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

grampanchayat karmachari,

ग्रामविकास मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त

अहमदनगर | प्रतिनिधी

Grampanchayat karmachari: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आश्वासनानंतरही ठोस अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) यांच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

बुरुडगाव रोडवरील भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयापासून मोर्चा सुरू झाला. या मोर्चात आयटकचे जिल्हा सचिव तथा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, राज्य सदस्य मारुती सावंत, कॉ. सतीश पवार, उत्तम कटारे, महादेव शेळके, विजय सोनवणे, बलभीम कालापहाड, दादा साळवे, गोरक्ष भावले, बाळासाहेब लोखंडे, सचिन कांबळे, विनोद कांबळे, आनंदराव शिंदे, नितीन काळे, संतोष घोरपडे, किशोर डाके, अशोक पालवे, भगवान फुलमाळी, अंबादास सपकाळ, आदिनाथ गीते आदी सहभागी झाले.

महासंघाने २० मेपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिन्यात अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. मात्र अडीच महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
प्रमुख मागण्या:

आगामी आंदोलनांचे टप्पे:

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Exit mobile version