Dr Babasaheb Ambedkar tribute: चालक-मालक संघटनेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन
Dipak Shirsath
अहमदनगर | प्रतिनिधी
Dr Babasaheb Ambedkar tribute: माळीवाडा बस स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. यानंतर चालक-मालक संघटना, नगर-नेवासा लाईन, तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
या वेळी संघटनेचे लतीफ सय्यद यांनी पुतळ्याला अभिवादन करत बहुजन समाजाच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्यासोबत प्रतीक बारसे, सुशांत म्हस्के, साजिद खान, आसिफ शेख, वसीम शेख, जावेद शेख, तन्वीर कुरेशी, हुसेन शेख, राजू शेख, शफिक शेख, शाहिद शेख, वाहिद शेख, कमर शेख, पप्पू बारस्कर, अझर खान, तंजीम शेख, अनवर शेख, फिरोज शेख, शक्ती शेख, सत्तार शेख, अलि बेग, बाबू सय्यद, पांडुरंग केदार आदी उपस्थित होते.
यावेळी लतीफ सय्यद म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला संविधान दिले, अस्मितेचा अधिकार दिला. त्यामुळे बाबासाहेब हे समस्त बहुजनांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही आम्हाला ऊर्जा देते. शहरात उभारलेला पूर्णाकृती पुतळा हा एक अभिमानास्पद उपक्रम असून त्यास अभिवादन करणे हे आमचे कर्तव्य आहे.”