सुपरफास्ट बातमी

Chichondi patil: चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतर्फे ऑगस्ट क्रांती पंधरवडा उत्साहात; 2 कोटी 11 लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

Chichondi patil, ऑगस्ट,

नगरतालुका | प्रतिनिधी

Chichondi patil: चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच शरदभाऊ खंडेराव पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली “ऑगस्ट क्रांती पंधरवडा” उत्साहात सुरू आहे. ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत १ ऑगस्ट रोजी प्रारंभ करून कृषी, आरोग्य, महसूल, महिला व बालकल्याण, शिक्षण, ग्रामस्वच्छता आदी विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी गावात येऊन थेट योजना राबवण्यात आल्या. या काळात २ कोटी ११ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

या पंधरवड्यात म्हसोबावाडी, खंडोबा नगर, रेणुका नगर, गराडी वस्ती, तळेवाडी, पवार पट्टा रोड या नव्या वस्त्यांनाही योजनांचा लाभ मिळणार आहे. नागरिक, महिला, तरुण मंडळी आणि स्थानिक संघटनांचा या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
१ ऑगस्ट – निर्मल ग्रामस्वच्छता दिन : गावभर स्वच्छता मोहिम, शाळा-अंगणवाडी व मंदिर परिसर स्वच्छता, २ हजार डस्टबिनचे वाटप.
२ ऑगस्ट – वृक्षारोपण क्रांती दिन : स्थानिक नारळ व वडाची झाडे लावणे, मोतीबाग परिसरात वृक्ष व बाकड्यांचे दान.
३ ऑगस्ट – जनकल्याण दिन : रेशन अडचणी सोडवणे, ९९ नव्या कुटुंबांना धान्य सुरू.
४ ऑगस्ट – कृषी व पशुविकास दिन : माती परीक्षण, पीक मार्गदर्शन, जनावरांचे लसीकरण.
५ ऑगस्ट – संजय गांधी निराधार योजना व डाक पोस्ट दिन : विधवा व वयोवृद्ध महिलांना योजना मार्गदर्शन.
६ ऑगस्ट – आरोग्य क्रांती दिन : २०० नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड, १५ नेत्ररुग्णांची शस्त्रक्रिया.

आगामी दिवसांत डिजिटल सेवा दिन, महसूल क्रांती दिन, महिला व बालकल्याण विकास दिन, विद्यार्थी-पालक शिक्षण दिन, ग्रामपंचायत स्थापनादिन, महाश्रमदान दिन व भव्य स्वातंत्र्य दिन अशा कार्यक्रमांद्वारे १००% मतदार नोंदणी, १००% आयुष्मान भारत कार्ड, सीसीटीव्ही बसविणे, शालेय प्रश्न सोडवणे व विविध योजनांचे लोकार्पण होणार आहे.
या उपक्रमांमुळे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात विश्वास दृढ झाला असून, जिल्ह्यात असा उपक्रम राबवणारी ही एकमेव ग्रामपंचायत असल्याची चर्चा आहे.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Exit mobile version