Chichondi patil: चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचा ऑगस्ट क्रांती पंधरवडा

Photo of author

By Dipak Shirsath

Chichondi patil, चिचोंडी पाटील

अहमदनगर | प्रतिनिधी

Chichondi patil: चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे सरपंच शरदभाऊ खंडेराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑगस्ट क्रांती पंधरवडा’ आणि ‘ग्रामस्वराज्य अभियान’ 1 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. या उपक्रमांतर्गत गावात थेट शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, 2.11 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन व कार्यारंभ या पंधरवड्यात झाला आहे.

Chichondi patil, चिचोंडी पाटील

1 ऑगस्टला महिलांच्या हस्ते चुल पेटवून पंधरवड्याचा शुभारंभ झाला. त्यानंतर निर्मल ग्रामस्वच्छता मोहिमेअंतर्गत शाळा, मंदिरे, अंगणवाड्या व अमरधाम परिसरात सफाई व जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत 2000 कचराकुंड्यांचे घरोघरी वाटप करण्यात आले.
2 ऑगस्ट रोजी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या उपक्रमात नारळ व वडाची झाडे लावण्यात आली. मोतीबाग परिसरात अनेकांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण केले.
3 ऑगस्टला तालुका पुरवठा अधिकारी शिवराज पवार यांच्या उपस्थितीत अन्नधान्य योजनांची माहिती देण्यात आली. 99 नव्या लाभार्थ्यांना रेशन सुविधा सुरू करण्यात आली.
Chichondi patil, चिचोंडी पाटील
4 ऑगस्ट रोजी शेतात माती परीक्षण, पीक मार्गदर्शन, पशुलसीकरण शिबीर यशस्वीरित्या पार पडले.
5 ऑगस्टला संजय गांधी निराधार योजना, वयोवृद्ध सहाय्य योजना, विधवा डोल आणि डाक विभागाच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली.
6 ऑगस्टला आरोग्य विभागाच्या वतीने ‘आयुष्मान भारत वंदना’ अंतर्गत 200 लोकांना आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आले. 15 नेत्ररुग्णांना पुढील उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात आले.
येणारे उपक्रम:
  • डिजिटल सेवा दिन
  • महसूल क्रांती दिन
  • महिला व बालकल्याण दिन
  • ग्रामपंचायत स्थापनादिन
  • विद्यार्थी-पालक शिक्षण दिन
  • महाश्रमदान दिन (14 ऑगस्ट)
विशेष उपक्रम:
  • 100% मतदार नोंदणी अभियान
  • प्रत्येक चौकात व अंगणवाडीत सीसीटीव्ही बसवणे
  • सरपंच एक दिवस शाळेत!
  • शासकीय अधिकाऱ्यांची माहिती व तक्रार पेटी
  • सार्वजनिक स्वच्छता मोहीम
  • Chichondi patil, चिचोंडी पाटील

सरपंच शरदभाऊ पवार यांनी सांगितले की, “या अभियानामुळे शासन व ग्रामस्थ यांच्यातील विश्वास दृढ झाला असून चिचोंडी पाटील ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे जी इतक्या मोठ्या प्रमाणावर शासकीय योजनांची थेट अंमलबजावणी करते.”

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Leave a Comment