सुपरफास्ट बातमी

Ahmednagar | अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा 9 जुलैपासून; जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागासाठी आमंत्रण

अहमदनगर | २९ जून | प्रतिनिधी

 रायसोनी फाउंडेशनच्या वतीने आयोजित योनेक्स सनराईझ जी.एच. रायसोनी मेमोरियल जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी व जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा 2025 ही स्पर्धा दिनांक 9, 10 व 11 जुलै 2025 रोजी वाडियापार्क बॅडमिंटन हॉल, अहमदनगर येथे पार पडणार आहे.

जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेत 11 वर्षांपासून खुल्या गटापर्यंतच्या वयोगटातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:

  • 11, 13 व 15 वर्षांखालील गट – मुले व मुली: एकेरी व दुहेरी अजिंक्यपद स्पर्धा

  • 17 व 19 वर्षांखालील गट – मुले व मुली: एकेरी व दुहेरी निवड चाचणी

  • खुला गट – मुले व मुली: एकेरी व दुहेरी निवड चाचणी

असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

अहमदनगर

नावनोंदणीची अंतिम तारीख: 7 जुलै 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
नाव नोंदवण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
ही स्पर्धा फक्त जिल्ह्यातील खेळाडूंसाठी खुली असून, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली व नियमानुसार होणार आहे. याकरिता राज्य संघटनेची तांत्रिक समिती उपस्थित राहणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
मिलिंद कुलकर्णी (सचिव, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन) – मो. 9423162632

हे हि वाचा : पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली: भारताचा ‘बर्डमॅन’

Exit mobile version