Ahmednagar: जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप

Photo of author

By Dipak Shirsath

Ahmednagar, जिल्हा परिषद,
साहित्यवाटप करताना उपस्थित मान्यवर…

गुणवंतांचा सन्मान व वाचनासाठी पुस्तके भेट

नगर तालुका | प्रतिनिधी

Ahmednagar: कर्जुने खारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वाचन प्रेरणेसाठी पुस्तके वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके होत्या. यावेळी युवा शास्त्रज्ञ डॉ. रणजीत राऊत, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेश कांबळे, उद्योजक अजय लामखडे, भाऊराव गायकवाड, सेवानिवृत्त जिल्हा मेट्रन छाया निमसे, आपला मावळा अध्यक्ष रामेश्वर निमसे, उद्योजक संग्राम आंधळे, शिवाजी उबाळे, माजी उपसरपंच अंकुश शेळके, नवनाथ शिंदे, वजीर शेख, गणेश तोरडमल, मेजर भागवत शेळके, भारत बोबडे, स्वप्नील निमसे, गणेश मोरे, अमर बोबडे, कैलास लांडे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar, जिल्हा परिषद,
पालकांचा सन्मान करताना.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव प्रियांका शेळके यांनी केले.

कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत शेळके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि मराठी माध्यमातील शाळांना चालना देणे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले.

इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन-पेन्सिल किट देऊन स्वागत करण्यात आले. अन्य विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात आले. वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महापुरुषांचे चरित्र व गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली.
लंके यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “कृष्णाली फाउंडेशनने समाजाच्या गरजा ओळखून घेतलेला हा उपक्रम खरंच दिशादर्शक आहे.”
छाया निमसे, गेली ३० वर्षे आरोग्य सेवा देत असलेल्या आणि अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या सेवाभावी व्यक्तिमत्वाचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. रणजीत राऊत यांचा देखील वटवृक्ष देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शाळेतील एका विद्यार्थिनीने खासदार निलेश लंके व राणी लंके यांचे काढलेले स्केच भेट दिले. पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी फोनवरून संवाद साधत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन कैलास लांडे यांनी मानले. या उपक्रमात उद्योजक सागर गांधी व संग्राम आंधळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

Leave a Comment