अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar Sports: फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि. 30 ऑगस्ट) झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. विविध वयोगटातील गटांमध्ये आर्मी पब्लिक स्कूल, कैसर एज्युकेशन, आठरे पाटील स्कूल आणि ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलचे संघ विजयी ठरले. विशेष म्हणजे आर्मी पब्लिक स्कूलच्या श्रेया कावरे हिने 17 वर्षाखालील मुलींच्या गटात तब्बल 7 गोल करत संघाला भक्कम विजय मिळवून दिला.
14 वर्ष वयोगट (मुले)
-
आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध अशोकभाऊ फिरोदिया स्कूल – आर्मी पब्लिक स्कूलने आक्रमक खेळी करत 6-0 ने विजय मिळवला. प्रथमेश लहाडे (3 गोल), आशिष शेळके (2 गोल) व शंतनू (1 गोल) यांनी चमकदार खेळ केला.
-
कैसर एज्युकेशन विरुद्ध डॉन बॉस्को स्कूल – अटीतटीच्या सामन्यात वेदांत भांडेकरच्या गोलमुळे कैसर एज्युकेशनने 1-0 ने विजय मिळवला.
-
तक्षिला स्कूल विरुद्ध आठरे पाटील स्कूल – आठरे पाटीलने 3-1 असा विजय मिळवला. साई खतोडे (2 गोल) आणि ओम गलांडे (1 गोल) यांनी गोल केले. तक्षिला स्कूलकडून शौर्य मोरेने 1 गोल केला.
17 वर्षाखालील मुलींचा गट
-
आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध डॉन बॉस्को स्कूल – आर्मी पब्लिक स्कूलने 10-0 असा एकतर्फी विजय मिळवला. श्रेया कावरेने तब्बल 7 गोल केले. तर आरतीने 2 व श्रेया पवारने 1 गोल करून संघाचा विजय निश्चित केला.
12 वर्ष वयोगट (मुले)
-
द आयकॉन पब्लिक स्कूल विरुद्ध ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल – रोमांचक सामन्यात ऑक्झिलियम कॉन्व्हेंटने 1-0 ने विजय मिळवला. वेदांत बांगरने एकमेव गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
16 वर्ष वयोगट
-
तक्षिला स्कूल विरुद्ध आठरे पाटील स्कूल – रंगतदार आणि अटीतटीचा सामना अखेर बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी 2-2 गोल केले. तक्षिलाकडून जस्वीर ग्रोव्हर व आयुष गुंड यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर आठरे पाटीलकडून भानुदास चंदने 2 गोल केले.