Ahilyanagar Sports: फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार प्रदर्शन

Photo of author

By Dipak Shirsath

Ahilyanagar Sports, फुटबॉल,

मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल तर मुलांमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, द आयकॉन पब्लिक स्कूलची विजयी घोडदौड

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar Sports: फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंनी रंगतदार सामने खेळले. 12, 14 व 16 वर्ष वयोगटातील संघांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत अटीतटीचे सामने रंगवले. पहिल्याच दिवसापासून मुलींच्या संघांनी दमदार खेळ दाखवला असून मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल, तर मुलांमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट व द आयकॉन पब्लिक स्कूलची विजयी घोडदौड सुरू आहे.

Ahilyanagar Sports, फुटबॉल,

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवार (दि. 26 ऑगस्ट) रोजी 17 वर्षांखालील मुलींच्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध आठरे पाटील स्कूलचा सामना रंगला. आठरे पाटील स्कूलच्या वेदिका ससे हिने सलग तीन गोल नोंदवत संघाला 0-3 अशा फरकाने विजय मिळवून दिला.

14 वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात आठरे पाटील स्कूल विरुद्ध ऑक्झिलियम कॉन्व्हेंट शाळेत अटीतटीचा सामना खेळला गेला. ऑक्झिलियमच्या अर्णव नाकाडे याने निर्णायक गोल करत संघाला 0-1 असा विजय मिळवून दिला.

Ahilyanagar Sports, फुटबॉल,

दुपारच्या सत्रात 17 वर्षांखालील मुलींच्या गटात द आयकॉन पब्लिक स्कूल व ऊर्जा गुरुकुल संघांमध्ये झालेला सामना गोलशून्य राहिला. हा सामना अनिर्णित ठरला. त्याचप्रमाणे 12 वर्षे वयोगटात (मुले) द आयकॉन पब्लिक स्कूल व ऊर्जा गुरुकुल यांच्यातील सामना देखील 0-0 असा अनिर्णित राहिला.

14 वर्षे वयोगटातील मुलांच्या सामन्यात द आयकॉन पब्लिक स्कूलने डॉन बॉस्को स्कूलवर 5-0 असा धडाकेबाज विजय मिळवला. ओम लोखंडे, मयंक बजाज व विराज पिसे यांनी प्रत्येकी एक गोल, तर इशान गरड यांनी दोन गोल केले.

16 वर्षे वयोगटात द आयकॉन पब्लिक स्कूल विरुद्ध डॉन बॉस्को सामन्यात युवान शर्मा याने एकमेव गोल करत संघाला 1-0 असा विजय मिळवून दिला.

स्पर्धेचे पंच म्हणून सलमान शेख, प्रियंका आवारे, सोनिया दोसानी, प्रकाश कनोजिया, महिमा पठारे, सूर्य नैना, पूजा भिंगारदिवे, जॉय शेळके, अभय साळवे व विल्यम राज यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्सचे सदस्य सातत्याने परिश्रम घेत आहेत.

Ahilyanagar Sports, फुटबॉल,

शहरात फुटबॉल खेळ रुजवण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना चालना देण्यासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या पुढाकारातून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय वयातच उत्कृष्ट खेळाडू घडावेत या उद्देशाने मागील सहा वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन होत आहे. यावर्षी जिल्ह्यातील तब्बल 47 शालेय संघांनी सहभाग नोंदवला आहे.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Leave a Comment