Ahilyanagar shivsena: काळे धंदे, भ्रष्ट कारभार, सत्ताधारी महाराष्ट्रावर भार! भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेनेची निदर्शने

Photo of author

By Dipak Shirsath

Ahilyanagar shivsena, महाराष्ट्र

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar shivsena: महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केले. भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या निदर्शनात नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, नगर दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख जगदीश चौधरी, तालुकाप्रमुख बबनराव शेळके, माजी नगरसेवक योगिराज गाडे, युवासेना जिल्हाप्रमुख पप्पू भाले, मनोज गुंदेचा, रावजी नांगरे, जेम्स अल्हाट, महेश कुलकर्णी, चंद्रकांत शेळके, मारुती राठोड, रामकिसन भिसे, आदम पठाण, सुभाष बोरसे, गौरव ढोणे, आनंद राठोड, विलास उबाळे, महावीर मुथा, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, सुनील भोसले, अनिस चुडीवाला, शैलजा लांडे, उषा भगत, राजेश गारगूड, अजित हासे, प्रशांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Ahilyanagar shivsena, महाराष्ट्र

निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील काही मंत्री जुगार, जादूटोणा, भ्रष्टाचार व गैरव्यवहारात अडकले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. कृषी मंत्र्यांना क्रीडा मंत्रिपद देणे, समाजकल्याण मंत्र्यांवर ६० कोटींचा घोटाळा व १५०० कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतरही सरकार मौन बाळगत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यातील गृहमंत्र्यांच्या आईच्या नावे डान्सबार सुरू असून त्यावरही कारवाई न झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

भ्रष्टाचारातून लाभ घेणाऱ्या मंत्र्यांचे त्वरित राजीनामे घेऊन त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

 

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Leave a Comment