Ahilyanagar Environmental: लहान वय, मोठा संदेश; बाल मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

Photo of author

By Dipak Shirsath

Ahilyanagar Environmental, पर्यावरण रक्षण,

सावेडी उपनगरातील बाल भक्तांचा आगळावेगळा गणेशोत्सव

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar Environmental: सावेडी उपनगरातील श्रमिकनगरमध्ये चिमुकल्या बाल भक्तांनी ‘श्रीकृष्ण बाल मंडळ’ स्थापन करून यंदा प्रथमच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. स्वतःच्या हाताने घडविलेल्या वाघावर आरूढ गणरायाच्या शाडूमातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात पार पडली.

गेल्या पंधरा दिवसांपासून या बाल कार्यकर्त्यांनी मंडळ उभारणीचा निर्णय घेतला. गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. मंडळाचे बाल कार्यकर्ता कृष्णा भास्कर श्रीगादी यांनी स्वतःच्या हाताने मूर्ती घडविली. वाघावर विराजमान झालेला गणपती रंगरंगोटीने देखणा झाला असून, परिसरात या बाल मंडळाचे विशेष कौतुक होत आहे.

Ahilyanagar Environmental, पर्यावरण रक्षण,

मंडप उभारणीसाठी बाल कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक व टाकाऊ वस्तूंचा वापर केला. लाकडी बांबू, पाईप, घोटीव कागद, पुठ्ठा, तसेच मुलांनी सादर केलेल्या नक्षीकाम व कलाकृती यांच्या साहाय्याने लहानसा मंडप उभारून त्यामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण मंडपाची उभारणी मुलांनी स्वतःच्या हातांनी केली, त्यामुळे हा उपक्रम अधिक आगळावेगळा ठरला.

गणेश चतुर्थी निमित्ताने वाजत-गाजत मिरवणूक काढून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी मंडळातील सर्व कार्यकर्ते व परिसरातील भाविक उपस्थित होते. आरती, विधी व पूजा पार पाडली गेली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

Ahilyanagar Environmental, पर्यावरण रक्षण,

लहान वय असूनही मंडळाचे विचार मोठे आहेत. समाजात पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा या बालकांचा छोटासा प्रयत्न कौतुकास्पद आहे. गणेशोत्सव साजरा करताना निसर्गाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचा धडा त्यांनी दिला.

मंडळाचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: अथर्व येमुल
उपाध्यक्ष: रियांश गळांगे
सेक्रेटरी: कृष्णा श्रीगादी
खजिनदार: अभिषेक श्रीगादी
सदस्य: प्रथमेश येमुल, यथार्थ बुरगूल, हर्षित येमुल, संस्कृती येमुल, आराध्या येमुल

संपूर्ण उपनगर परिसरातून या बाल मंडळाचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Leave a Comment