सुपरफास्ट बातमी

Ahilyanagar Cricket: मराठा वॉरियर्स ठरला ‘साईदीप हिरोज चॅम्पियन चषक 2025’ चा मानकरी

Ahilyanagar Cricket,मराठा

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar Cricket: वाकोडी येथील साईदीप हिरोज क्रिकेट अकॅडमीतर्फे १९ वर्षाखालील व खुल्या गटातील खेळाडूंकरिता आयोजित साईदीप हिरोज चॅम्पियन चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. आठ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचे आयोजन साखळी पद्धतीने करण्यात आले होते.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत मराठा वॉरियर्स संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. शिवराज वॉरियर्स उपविजेते, युनायटेड क्रिकेट क्लब तृतीय तर समर्थ क्रिकेट अकॅडमी संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीचे निकाल पुढीलप्रमाणे:

पारितोषिक वितरण समारंभास संदीप घोडके, परेश रासकर, राजू शेख, स्वप्नील मिरपगारे, मराठा वॉरियर्स संघ चालक करण भोगाडे, तसेच सागर बनसोडे, मिनीनाथ गाडीलकर, प्रशांत शेरकर, तेजस करमरकर, मेजर राम हाके यांच्यासह अनेक मान्यवर व सर्व संघांचे खेळाडू उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदीप घोडके म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच क्रिकेटचे धडे घेणे आवश्यक आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. साईदीप हिरोज चषक स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ मिळत आहे. या मैदानावर वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून, यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळत आहे.”
हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Exit mobile version