सुपरफास्ट बातमी

Ahilyanagar Contractors: अधिक्षक अभियंत्याच्या खुर्चीला फुलांचा हार घालून आंदोलन; ठेकेदारांची थकित बिले द्या, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकणार – गुंदेचा

Ahilyanagar Contractors,अधिक्षक अभियंता

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar Contractors: कंत्राटदार व ठेकेदारांच्या थकित देयकांच्या तातडीने मंजुरीसाठी बिल्डर असोसिएशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घालून निवेदन चिकटविण्यात आले व निषेध व्यक्त करण्यात आला.

या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजय गुंदेचा, उपाध्यक्ष राहुल शिंदे, सचिव बाळासाहेब मुरदारे, सहसचिव विष्णू तवले, उदय मुंडे, प्रितम भंडारी, संजय डोके, भाऊसाहेब सोनवणे, ईश्वर जंजिरे, महेश वाकचौरे, संजय फुंदे, शैलेश मेहेर, रमेश आबा तोरडमल, रामचंद्र रेपाळे, श्रीकांत दराडे, किरण पागिरे, देवेंद्र गुंड, सोमनाथ शेटे, महेश गायकवाड, निलेश रोकडे, ज्ञानदेव नजन तसेच आंदोलनासाठी खास संगमनेरहून आलेले सदस्य एन. के. गाडे, रामदास कल्हापुरे, एस. पी. गोडसे, संकेत काकडे, हर्षल काढाणे आदी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, विविध योजनांच्या निधीबाबत यापूर्वीही अनेक आंदोलने व निवेदने देण्यात आली; मात्र सरकारकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. मार्च २०२५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांना फक्त ७ टक्के निधी वितरित केला होता, त्यानंतर अद्याप कोणताही निधी मिळालेला नाही.
संघटनेने वारंवार मागणी केली आहे की, मागील देयके पूर्ण केल्याशिवाय नवीन निविदा काढू नयेत. तसेच प्रलंबित देयकासाठी शासनाकडून ५ ते १० दिवसांत निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा विभागाच्या कार्यालया बाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे आधीच लेखी कळविण्यात आले होते. मात्र या पत्राची दखल न घेता कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असल्याचा आरोप करण्यात आला.

ठेकेदारांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, त्वरित निधी मंजूर करून थकित देयके अदा न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Exit mobile version