मराठा आरक्षणासाठी पोखर्डी येथे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आंदोलकाची प्रकृती ढासळली

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी 

प्रतिनिधी ( पोखर्डी ) ३१.१०.२०२३
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या गावात ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटलांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर अहमदनगर तालुक्यातल्या पोखर्डी गावच्या तरुणांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर रोडलगत असणाऱ्या साई आनंद लॉन येथे हे उपोषण सुरु आहे .या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. यामध्ये सरपंच रामेश्वर निमसे यांच्यासह विक्रम भगत व रोहित ससे हे सहभागी आहेत. विक्रम भगत या आंदोलकाची प्रकृती ढासळत चालली आहे.

दरम्यान, सरपंच रामेश्वर निमसे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे. मात्र जरांगे पाटलांच्या जीवाला काही झालं तर राज्य सरकारला खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही ते म्हणाले आहेत.

Leave a Comment