मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक इसळक येथे काढला कॅण्डल मार्च

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( निंबळक ) ३१.१०.२०२३
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. गावागावात दुसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषण करत कॅण्डल मार्च काढले जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातल्या निंबळक व इसळक मध्ये देखील कॅण्डल मार्च काढत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवण्यात आले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही , आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं , जय भवानी जय शिवाजी , छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध देखील नोंदवण्यात आला. निंबळक येथील दत्तमंदीर चौकातुन या कॅण्डल मार्चला सुरुवात करून मिरवणूक मार्गे फेरी मारत पून्हा दत्त मंदीर चौकात येथे येत हा कॅण्डल मार्च संपन्न करण्यात आला. या कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.

Leave a Comment