अहमदनगर | प्रतिनिधी
निंबळक येथील कोटी लिंग तीर्थावरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत हरिहर महाराज पायी दिंडीचे आज नालेगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. माजी नगरसेवक अजय चितळे यांच्या वतीने दिंडीचे औक्षण व पूजन करण्यात आले.
यावेळी जालिंदर महाराज निकम यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्व. चंद्रकला चितळे व स्व. भीमराज चितळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिंडी सोहळ्यातील अन्नदान पंगतीसाठी अजय चितळे यांच्या वतीने देणगी देण्यात आली.
या कार्यक्रमावेळी सचिन चितळे, विनायक वाघ, देवेंद्र बेरड, स्वप्निल राक्षे, संदीप दहिवाले, शंभू बनकर, शुभम घोडे, सुनील चितळे, गजेंद्र कवडे, अरुण लांडे, गणेश लांडे, राजूभाऊ कदम, रामभाऊ कवडे, भैय्या चौधरी, श्रीकांत लांडे, नितीन रोहकले, व विशाल बेरड आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read Also: पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली: भारताचा ‘बर्डमॅन’