World Records: 610 किलो मोतीचूर लाडूने रचला विश्वविक्रम; अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अनोखा उपक्रम

Photo of author

By Dipak Shirsath

 

World Records,विश्वविक्रम,अमित शाह,

पुणे | प्रतिनिधी

World Records: दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेर येथे तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून एक अनोखा विश्वविक्रम रचण्यात आला आहे.

या भव्य लाडूसाठी १५० किलो बेसन, ३०० किलो साखर आणि १५० किलो तूप यांचा वापर करण्यात आला. हा लाडू “सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू” म्हणून Winners Book of World Records मध्ये अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य

या लाडूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान Winners Book of World Records चे चेअरमन आणि अभिनेत्री मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी या विश्वविक्रमाची घोषणा केली.

तसेच, विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका डॉ. त्रिवेणी, आणि समृद्धी केटरर्सचे संचालक जालिंदर वाळके यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हा उपक्रम अमित शाह यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून समाजात प्रेम, ऐक्य आणि स्नेहाचा संदेश देणारा ठरला. विशेष म्हणजे, सदर ६१० किलो मोतीचूर लाडू चार अनाथ आश्रमांना वितरीत करण्यात आला.

हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

 

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group