नवी दिल्ली | प्रतिनिधी
Fake universities: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील २२ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील ‘राजा अरबीक युनिव्हर्सिटी’ चा देखील समावेश आहे. या विद्यापीठांना कायदेशीर मान्यता नसल्याचे UGC ने स्पष्ट केले आहे.
🔹 UGC च्या अहवालानुसार राज्यनिहाय बोगस विद्यापीठांची संख्या:
दिल्ली: १०
उत्तर प्रदेश: ४
आंध्र प्रदेश: २
केरळ: २
पश्चिम बंगाल: २
महाराष्ट्र: १ (राजा अरबीक युनिव्हर्सिटी, नागपूर)
पाँडिचेरी: १
अशा प्रकारे देशभरातील एकूण २२ बोगस विद्यापीठांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
📚 UGC ची विद्यार्थ्यांना सूचना:
UGC च्या माहितीनुसार, काही संस्थांकडून ‘विद्यापीठ’ हे नाव वापरून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे.
या संस्थांना ना UGC ची मान्यता आहे, ना कायदेशीर दर्जा. त्यामुळे अशा विद्यापीठांकडून दिली जाणारी पदवी
अवैध आणि अमान्य आहे.
📢 विद्यार्थ्यांना आवाहन:
“शिक्षण घेण्यापूर्वी संबंधित विद्यापीठाला UGC ची कायदेशीर मान्यता आहे का, हे तपासावे.
केवळ अधिकृत आणि मान्यताप्राप्त विद्यापीठांमधूनच शिक्षण घ्यावे.”


