Social: गीते यांनी दाखवलेले कर्तृत्व व धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी- डोंगरे; सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शौर्य गौरव पुरस्काराने सन्मानित

Photo of author

By Dipak Shirsath

अहमदनगर | प्रतिनिधी

Social: जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचे जीव वाचवणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय शौर्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, पै. नाना डोंगरे व्यायाम शाळा आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Social,प्रल्हाद गीते,

या सन्मान समारंभप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल खंडेराव शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वडणे, संजय सावंत, रमेश शिंदे, अन्सार शेख, महिला पोलीस नाईक धनवडे, मनिषा काळे, रजनी ताठे, संदीप डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे वाळुंबा नदीला आलेल्या पुरात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मोठ्या धाडसाने पाच लोकांचे प्राण वाचवले. ढगफुटी सदृश्य परिस्थितीत गीते यांनी जीवाची पर्वा न करता पूरबाधित नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांनी केवळ कर्तव्याच्याच नव्हे तर मानवतेच्याही पातळीवर जाऊन दिलेल्या या योगदानासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.”

हे हि वाचा : public issue: नगर तालुक्यातील स्वस्त धान्य वितरणात अडचणी; तहसिलदारांना निवेदन सादर

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

हे हि वाचा : Politics: निमगाव वाघा सरपंचपदी उज्वला कापसे यांची 8-1 बहुमताने निवड

Leave a Comment