social: निंबळक माध्यमिक विद्यालयास इन्व्हर्टर, पुस्तके भेट; धामी दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम

Photo of author

By Dipak Shirsath

social,निंबळक ,माध्यमिक विद्यालय

नगर तालुका | प्रतिनिधी

social: माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक येथे सोमवार, ता. २१ जुलै २०२५ रोजी वाढदिवसाच्या अनाठायी खर्चास फाटा देत समाजप्रेरक उपक्रम राबविण्यात आले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरज धामी व अपर्णा टकले/धामी या दाम्पत्याने मुलगा आरव व मुलगी कृष्णाली यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला ३२ हजार रुपये किमतीची मौल्यवान पुस्तके भेट दिली.

social,निंबळक ,माध्यमिक विद्यालय

या दिवशी विद्यालयातील आणखी एक उल्लेखनीय घटना म्हणजे मुख्याध्यापिका सौ. संगीता जाजगे (आडसुळ) यांच्या परिवाराने त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेस ४२ हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर संच भेट दिला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही भेट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

तसेच, शिक्षक एम. डी. कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनीला गणवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांप्रती असलेली संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले.

social,निंबळक ,माध्यमिक विद्यालय

धामी, जाजगे आणि कोतकर कुटुंबीयांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोतकर यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापिका संगीता जाजगे (आडसुळ), श्रीमती. एस. एम. कोतकर, गणेशसिंह धामी, प्रताप बांडे, संजय गेरंगे, विलास कोतकर, सुभाष होळकर, योगेश धामी, मारुती कोतकर, ज्ञानदेव गायकवाड, श्री. शेख, कोतकर एम डी, श्रीमती चौधरी,श्री. भुतारे, कु. ताकवले, सौ. डहाळे, श्री. सुर्यवंशी, श्रीमती. खंडागळे, कु. आळंदीकर, श्रीमती. पाडळे, दत्ता घोलप, अरुण दळवी, श्री. गोत्राळ, दत्तात्रय मुठे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब कोतकर यांनी केले.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Leave a Comment