Social: मोबाईल रिटेल असोसिएशनच्या महा रक्तदान शिबिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उत्स्फूर्त सहभाग

Photo of author

By Dipak Shirsath

Social, रक्तदान

अहमदनगर | प्रतिनिधी

Social: अहिल्यानगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने शहरात आयोजित महा रक्तदान शिबिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत माणुसकीचा संदेश दिला. रविवारी (ता. २० जुलै) नंदनवन येथे झालेल्या शिबिरात “वाह भाई वाह…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

मागील पंचवीस वर्षांपासून सामाजिक, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत रक्तदानासाठी पुढाकार घेतला. अभिजीत सपकाळ, दिपकराव धाडगे, सुधीरशेठ कपाळे, मुन्ना वाघस्कर, शशांक अंबावडे, योगेश हळगावकर, जालिंदर अळकुटे, योगेश चौधरी, सर्वेश सपकाळ यांसह अनेक सदस्यांनी रक्तदान केले.

Social, रक्तदान

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक संजय सपकाळ होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, “रक्त ही रुग्णाच्या जीवासाठी आवश्यक बाब असून, थैलीसीमिया, डायलिसिस, कर्करोग तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान अत्यावश्यक असते. अशा वेळी रक्तदाता हा एखाद्याचा जीवदाता ठरतो.”
या कार्यक्रमाला रमेश वराडे, जहीर सय्यद, दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अशोक पराते, दीपक घोडके, रतनशेठ मेहेत्रे, मनोहर दरवडे, सुभाष पेंढुरकर, दीपकशेठ मेहतानी, मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, बंटी दळवी, नितीन नामदे, सचिन पेंढुरकर, अविनाश जाधव, निजाम पठाण, शेषराव पालवे, प्रकाश देवळालीकर, नवनाथ वेताळ, प्रज्योत सागू, अजेश पुरी, नामदेवराव जावळे, दिलीपशेठ गुगळे, रामनाथ गर्जे, शिरीष पोटे, राजू कांबळे, किरण फुलारी, डॉ. अतुल मडावी, देविदास गंडाळ यांची उपस्थिती होती.

Social, रक्तदान

यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी हरदिन ग्रुपच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत, रक्तदान मोहिमेला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमात आमदार जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचाही गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

Social, रक्तदान

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Leave a Comment