अहिल्यानगर | प्रतिनिधी
Maratha Seva Sangh: मराठा सेवा संघाच्या दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी संपूर्णा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव तनपुरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी सहाय्यक प्रदेश समन्वयक व मार्गदर्शक बाळासाहेब शेटे, विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, जिल्हा अध्यक्ष प्रवीण दहातोंडे, राजेंद्र निबाळते आणि प्रदेश समन्वयक मनोज ढोकचौळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्णा सावंत यांनी यापूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून, त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेड प्रदेश विभागीय कार्याध्यक्षा म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. समाजकार्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेत मराठा सेवा संघाच्या दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
त्या लायन्स क्लबच्या माजी अध्यक्ष असून, लीनेस क्लबच्या संस्थापक आणि माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. पर्यावरण निवारण महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या राज्य संघटक पदावर तसेच ग्राहक संरक्षण निवारण मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याचा अनुभव त्यांना आहे.
या निवडीबद्दल बाळासाहेब शेटे, प्रा. अर्जुनराव तनपुरे, दीपक भदाणे आदींनी संपूर्णा सावंत यांचे अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना संपूर्णा सावंत म्हणाल्या की,
“मराठा सेवा संघाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनापासून आभारी आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेचे विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. महिला, युवक आणि शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन,” असे त्या म्हणाल्या.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांवरून संपूर्णा सावंत यांचे अभिनंदन होत आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


