श्रीगोंदा | प्रतिनिधी
Sambhaji Brigade aandolan: श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छता, मंडईसाठी जागा, पार्किंग व्यवस्था, निकृष्ट दर्जाचे स्पीडब्रेकर, भटकी जनावरे, अतिक्रमण, सीसीटीव्ही कॅमेरे आदी विविध समस्यांबाबत संभाजी ब्रिगेड पक्षाकडून नगरपरिषदेला दोन वेळा निवेदन देण्यात आले होते. तथापि, या निवेदनांकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी तीव्र आंदोलन छेडले.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी भगत मॅडम यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त केला. आंदोलन सुरू असताना सुरुवातीला मुख्याधिकारी दालनातून बाहेर पडल्या, मात्र तब्बल तीन तासांनंतर चर्चेसाठी बोलावले. तथापि, कार्यकर्त्यांनी “चर्चा लाईव्ह करा” अशी मागणी केल्यानंतर त्यांनी चर्चा टाळली.
संभाजी ब्रिगेड पक्षाचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी सांगितले की, कामचुकार मुख्याधिकारी यांना प्रशासक पदावरून हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
या आंदोलनासाठी पक्षाचे मुख्य सचिव सुयोग धस, उपाध्यक्ष दिलीप लबडे, प्रफुल्ल उर्फ बापू जगताप, संदिप जगताप, रवींद्र महंदुळे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष घनश्याम काळे, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष सद्दाम शेख, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष उत्तम घोगरे, उपाध्यक्ष पांडुरंग खोरे, कृष्णा जगताप, युवक आघाडी उपाध्यक्ष प्रतीक साळवे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.