Rohit Pawar: महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद अध्यक्षपदी आ. रोहित पवार बिनविरोध; राज्यातील कुस्ती क्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धार

Photo of author

By Dipak Shirsath

Rohit Pawar, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद ,

मुंबई | प्रतिनिधी

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सचिवपदी विजय बराटे यांची निवड करण्यात आली असून, इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड एकमताने पार पडली. ही निवड म्हणजे त्यांच्या सामाजिक आणि नेतृत्व क्षेत्रातील कार्याची पावती असल्याचे मानले जात आहे.

पद स्वीकारल्यानंतर रोहित पवार म्हणाले, “जिल्हा परिषद, विधानसभा, क्रिकेटनंतर आता कुस्तीच्या चौथ्या मैदानात खेळण्याची संधी मिळाली आहे. ही संधीचं सोनं करून राज्यातील कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.” त्यांनी सर्व मतदार, जिल्हा संघटना आणि कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांचे मन:पूर्वक आभार मानले.

Rohit Pawar, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद ,

ते पुढे म्हणाले, “पैलवानांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं, आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळवून देणं, आणि मातीतल्या या खेळाला आभाळाइतकं मोठं करण्याचा माझा निर्धार आहे.”

रोहित पवार यांनी या संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. मामासाहेब मोहोळ, तसेच आदरणीय शरद पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत ही संधी आपलं भाग्य असल्याचं नम्रतेने सांगितलं.

Rohit Pawar, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद ,

त्यांनी स्पष्ट केलं की, “राज्यात एकच अधिकृत संघटना म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद” असून, ही निवडणूक त्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.

सचिव विजय बराटे यांच्यासह इतर नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचेही रोहित पवार यांनी मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Leave a Comment