मुंबई | प्रतिनिधी
Reserve Bank of India (RBI) ने जुन्या आणि निष्क्रिय बँक खात्यांमधील रक्कम परत मिळवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक नागरिकांची खाती 10 वर्षांपासून वापरात नसल्यामुळे त्यांतील रक्कम ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी (DEA Fund) मध्ये हस्तांतरित केले गेलेली असू शकते. मात्र, संबंधित ठेवीदार अजूनही ही रक्कम परत मिळवण्याचा दावा करू शकतात.
रिझर्व्ह बँकेने या उद्देशासाठी ‘Udgam’ पोर्टल सुरु केले आहे. आपली विसरलेली ठेवी शोधण्यासाठी आणि परत मिळवण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त आहे: https://udgam.rbi.org.in
🔍 विसरलेली बँक खाती आणि ठेवी तपासण्याची प्रक्रिया
✅ प्रथम Udgam Portal ला भेट द्या आणि आपल्या नावाने असलेल्या निष्क्रिय ठेवी तपासा.
✅ संबंधित बँकेच्या जवळच्या शाखेत भेट द्या.
✅ KYC कागदपत्रे जमा करा — (आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स).
✅ पात्र ठरल्यास आपली रक्कम (व्याजासह, लागू असल्यास) परत मिळेल.
🏦 RBI विशेष शिबिरे
रिझर्व्ह बँक आणि विविध बँका ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान “दावा न केलेल्या ठेवींवर विशेष शिबिरे” आयोजित करणार आहेत. या शिबिरांत नागरिकांना मार्गदर्शन व सहाय्य दिले जाईल.
RBI चे आवाहन:
“जाणकार बना, सतर्क राहा — तुमचे पैसे तुमचेच आहेत!”
अधिक माहितीसाठी आणि आपल्या खात्याशी संबंधित तपशील तपासण्यासाठी लगेच Udgam Portal ला भेट द्या.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


