मुंबई | प्रतिनिधी
(politics) हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या वरळी डोम येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे गट) व मनसेच्या वतीने ऐतिहासिक विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जवळपास दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे.
(politics) सभेसाठी वरळी डोममध्ये हजारो कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली असून, सभागृहात जागा नसल्यामुळे गेटबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड तुंबड झाली आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
(politics) मेळाव्याची सुरुवात गणेश वंदनेनं झाली. मराठी कलाकार तेजस्विनी पंडित, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनीही उपस्थिती लावून वातावरणात रंगत आणली.
दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजप आमदार नितेश राणेंवर जोरदार टीका करताना म्हटलं, “ते काल-परवा हिंदू झालेत, विश्वास ठेवू नका.” तर, सुषमा अंधारेंनी उपरोधाने नितेश राणेंना उद्देशून – “लहान पोरांचं बोलणं मनावर घ्यायचं नसतं” अशी खोचक टीका केली.
राजकारणात महत्त्वाचा टप्पा ठरणारा हा मेळावा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
हे हि वाचा : पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली: भारताचा ‘बर्डमॅन’