नगर तालुका | प्रतिनिधी
politics: सरपंच छाया संजय गेरंगे आणि उपसरपंच शोभा चंदू खामकर यांच्याविरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगित केल्याने ग्रामस्थांत आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला.

ता. 28 मार्च 2023 रोजी सरपंच व उपसरपंच यांच्याविरोधात सात सदस्यांच्या विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, या सभेस दोन सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे ठराव वैध न ठरल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला होता. तसेच दोन वर्षांनंतर पुन्हा विकासकामांमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अविश्वास ठराव पुन्हा मांडण्यात आला होता.
यासंदर्भात संजय गेरंगे यांनी सांगितले की, काही सदस्यांकडून वारंवार ‘टक्केवारी’ची मागणी होत होती. मात्र, सरपंच व उपसरपंच यांनी गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कामांना प्राधान्य दिल्यामुळे हे सदस्य नाराज होते. गावात पाच कोटींहून अधिक खर्चाची विकासकामे करण्यात आली असून ती ग्रामस्थांना समर्पित असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विरोधक गेल्या 35 वर्षांत सत्ता दूर राहिले होते. मात्र, 2020 मध्ये संजय गेरंगे यांनी त्यांना बरोबर घेत एकहाती सत्ता मिळवली. विकासकामांमध्ये विरोधकांनाही संधी देण्यात आली. तरीही काही सदस्यांनी स्वार्थासाठी विकासकामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरपंच छाया गेरंगे व उपसरपंच शोभा खामकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी निंबळकचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर, किसन बाबा कोतकर, संदीप गेरंगे, अरविंद बेरड, भाऊसाहेब गायकवाड, पोपट खामकर, दत्तात्रय गेरंगे, जालिंदर चव्हाण, आप्पा आमले, अशोक गेरंगे, गोरख गेरंगे, शिवाजी खामकर, महादेव गवळी, यशराज शिंदे, विठ्ठल पोमन, गणेश चव्हाण, रंजनदास गेरंगे, विठ्ठल गेरंगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
हे हि वाचा : पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली: भारताचा ‘बर्डमॅन’