Politics: भिंगारमध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपाने अजित पवार यांचा 66 वा वाढदिवस साजरा

Photo of author

By Dipak Shirsath

Politics, अजित पवार,भिंगार
भिंगारमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करताना मान्यवर

बालभवनच्या गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप; जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम

 

नगर तालुका | प्रतिनिधी


Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार यांचा 66 वा वाढदिवस भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तर स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवन येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Politics, अजित पवार,भिंगार
भिंगारमध्ये वृक्षारोपण करताना मान्यवर..

 

कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नंदकुमार झंवर (महेश नागरी पतसंस्था), शहराध्यक्ष संजय सपकाळ, शिवम भंडारी, अभिजीत सपकाळ, छावणी परिषदेचे सदस्य सुरेश मेहतानी, दीपकराव धाडगे, महिलाभागातील प्रांजली सपकाळ, जयश्री पोटे, संगीता दरवडे, संगीता सपकाळ, मनीषा गायकवाड आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपत बारस्कर यांनी सांगितले की, “ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबविले जात आहेत. जॉगिंग पार्कसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने निधी मिळवून संजय सपकाळ यांच्या पुढाकाराने उपयुक्त सुविधा उभारल्या गेल्या आहेत.”
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, “सामाजिक उत्तरदायित्व पेलताना भिंगार राष्ट्रवादी सातत्याने गरजूंसाठी कार्य करत आहे. विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम उल्लेखनीय आहेत.”
संजय सपकाळ यांनी पर्यावरण आणि शिक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती देताना, “विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी सातत्याने कार्य केले जात आहे,” असे सांगितले.
सचिन चोपडा म्हणाले, “भिंगार राष्ट्रवादी व हरदिन मॉर्निंग ग्रुप विविध सामाजिक चळवळी राबवत असून आरोग्य, पर्यावरण व शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी योगदान देत आहेत.”
कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे विजय पाखरे यांचा मुलगा प्रसाद विजय पाखरे याची ग्रामविकास अधिकारीपदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
नीलोफर शेख यांनी बालभवनच्या वतीने सर्वांचे आभार मानले. यावेळी बालभवनचे गुलनाज सय्यद, सुप्रिया सदलापुरकर, अंजूम शेख, अंबिका सदलापुरकर उपस्थित होत्या.
Politics, अजित पवार,भिंगार
भिंगारमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करताना मान्यवर

 

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Leave a Comment