अहिल्यानगर | प्रतिनिधी
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) आता रब्बी हंगामातही सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग ही महत्त्वाची रब्बी पिके समाविष्ट करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
📋 अधिसूचित पिके :
🌾गहू (बागायत)
🌾 रब्बी ज्वारी
🌾 हरभरा
🌾 रब्बी कांदा
🌾 उन्हाळी भात
🌾 उन्हाळी भुईमूग
🏢 अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निवडलेली कंपनी :
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषी विमा कंपनी (Agriculture Insurance Company of India Ltd.) करणार आहे. या अंतर्गत पीक विमा हप्ता सवलतीच्या दरात भरता येणार असून नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यामुळे होणारे नुकसान भरून काढता येईल.

🗓️ अर्ज करण्याच्या अंतिम मुदती :
रब्बी ज्वारी – ३० नोव्हेंबर २०२५
गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा – १५ डिसेंबर २०२५
उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग – ३१ मार्च २०२६
शेतकऱ्यांनी निर्धारित तारखेत ऑनलाइन किंवा बँकेमार्फत नोंदणी करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकृत होणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
🏦 कर्जदार शेतकऱ्यांसाठी सूचना :
कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज भरावा.
योजनेत सहभागी न होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी बँकेस लेखी कळवावे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


