ई-केवायसी पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा; अपूर्ण नोंदणीदारांनी त्वरित ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी

अहिल्यानगर | प्रतिनिधी
Agristack DBT: राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी पूर्ण असून डीबीटीवरील माहितीशी ती जुळली आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी जनरेट झाले असून केंद्र शासनाकडे पाठवलेली माहिती सुसंगत आहे, अशांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर अद्याप ई-केवायसी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांची नावे ‘E-KYC Pending’ यादीत दाखविली गेली असून, त्यांनी त्वरित ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📌 घरबसल्या तपासा अनुदानाची स्थिती:
राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आपले नाव नोंदणीकृत असल्यास, शेतकरी आता घरबसल्या अनुदान जमा झाले आहे की नाही, रक्कम कधी वर्ग झाली किंवा विलंबाचे कारण काय आहे, हे सहज तपासू शकतात.
फक्त एका क्लिकवर ही माहिती पाहण्यासाठी खालील लिंक उपलब्ध आहे 👇
🔗 लाभ तपासा येथे
प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी वेळेत नोंदणी व ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

