Maulana Azad Mahotsav: मौलाना आझाद महोत्सव समिती अध्यक्षपदी भैरवनाथ वाकळे; राष्ट्रीय एकता सप्ताह 6 ते 12 नोव्हेंबर

Photo of author

By Dipak Shirsath

 

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये विविध उपक्रमांसह राष्ट्रीय एकता सप्ताह आयोजित

Maulana Azad Mahotsav,मौलाना आझाद ,राष्ट्रीय एकता सप्ताह ,
 

अहमदनगर | प्रतिनिधी

Maulana Azad Mahotsav: स्वातंत्र्यसैनिक आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ता. ६ ते १२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान राष्ट्रीय एकता सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मौलाना अबुल कलाम आझाद महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून सर्वानुमते अध्यक्षपदी भैरवनाथ वाकळे तर सचिवपदी युनुस तांबटकर यांची निवड करण्यात आली आहे.

समितीतील इतर पदाधिकारी असे आहेत: उपाध्यक्ष इंजि. इकबाल सय्यद, संजय झिंजे, राजुभाई शेख; सहसचिव डॉ. शमा फारुकी, तन्वीर चष्मावाला, आरिफ सैय्यद; खजिनदार शफकत सैय्यद आणि जावेद अब्बास तांबोळी. सदस्यांमध्ये शेख अयाज गफुर, अतिक शेख, शेख फैय्याज (मा. नगरसेवक), सय्यद आरिफ, शाहनवाज तांबोली, तौफिक तांबोली, शेख इकबाल मुबारक, नईम सरदार, शेख आदिल रियाज, जावेद मास्टरआर्किटेक्ट फिरोज शेख यांचा समावेश आहे.

Ahilyanagar cultural politics: अहमदनगर मनपाच्या माजी विरोधी पक्षनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल! ‘महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश होऊ देणार नाही’ म्हणत धार्मिक ध्रुवीकरणाला कडाडून विरोध

सल्लागार म्हणून हाजी शौकत तांबोली, सैय्यद खलील, प्रा. डॉ. सलाम, इंजि. अभिजित वाघ, प्रा. डॉ. महेबुब सय्यद, निसार बागवान, शरफुद्दीन सर आणि अबरार शेख यांची निवड करण्यात आली आहे. या समितीची माहिती मखदुम सोसायटीचे सचिव डॉ. कमर सुरुर यांनी दिली.

राष्ट्रीय एकता सप्ताहाच्या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे — शाळांमध्ये निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, व्यसनमुक्ती अभियान, गडकिल्ले प्रदर्शन, आरोग्य शिबिरे तसेच निवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा. याशिवाय मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्यावर आधारित व्याख्यान आणि शैक्षणिक चर्चासत्रे आयोजित केली जातील.

या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनीही सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले आहे.

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group