अहिल्यानगर | प्रतिनिधी
Maratha soyrik: मराठा समाजातील विवाहसंस्थेला मजबूत आधार देत मराठा सोयरीक संस्थेने आजपर्यंत १०० मोफत वधू-वर परिचय मेळावे घेऊन शतक पूर्ण केले आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे म्हणाले की, “मराठा सोयरीकने केलेले कार्य हे समाजातील विवाह जुळवणी प्रक्रियेतील एक आदर्श उदाहरण असून, समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे.”

अखंड मराठा समाज आणि मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १०० वा मोफत वधू-वर परिचय मेळावा नगर शहरातील हॉटेल यश ग्रँड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात संस्थेची अत्याधुनिक वेबसाईट आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन प्रसिद्ध रीलस्टार सनी सकट आणि जान्हवी लटके यांच्या हस्ते करण्यात आले.
मेळाव्यासाठी रमाकांत नाना गाडे, महेश गाडे, प्रा. राजाराम मुंगसे (सिन्नर), संचालिका जयश्री कुटे, पारुनाथ ढोकळे, उद्योजक शरद ठाणगे, मधुकर निकम, हरिश्चंद्र दळवी, सयाजी निमसे, गोरक्षनाथ पटारे, मनोज सोनवणे, शशिकांत भांबरे, शांतीलाल कोहक, अनिल अकोलकर, प्रमोद झावरे, प्रा. योगेश कोतकर, संगीता ठुबे, मंदा कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रा. राजाराम मुंगसे म्हणाले की, “आजच्या काळात एक लग्न जमवणे अवघड झाले आहे; मात्र अशोक कुटे सर आणि त्यांच्या टीमने आतापर्यंत ५,००० पेक्षा जास्त विवाह जुळवले आहेत. त्यापैकी ५६७ विवाह हे विधवा, विदूर आणि घटस्फोटीत व्यक्तींचे आहेत. समाजातील अशा वर्गाला नवसंजीवनी देणे ही खरोखरच समाजसेवेची अभिव्यक्ती आहे.”
मेळाव्यात विविध जिल्ह्यांमधून आलेल्या वधू-वरांच्या पालकांनी सहभाग घेतला. सर्व वधू-वरांचा बायोडाटा वाचन जयश्री कुटे यांनी केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पारुनाथ ढोकळे यांनी मानले.
जे उमेदवार किंवा पालक मेळाव्यास उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी अधिक माहितीसाठी ८४५३९०२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे यांनी केले.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


