Maratha Aarkshan: दिसेल तिथे भगवा; काय चाललंय मुंबईत? उपोषण सुरू करताच पाटलांनी दिले 10 संदेश

Photo of author

By Dipak Shirsath

Maratha Aarkshan,मुंबई

मुंबई | प्रतिनिधी

Maratha Aarkshan: ऐन गणेशोत्सवात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन पुन्हा उभे ठाकले आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी त्यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून हजारो किमीचा प्रवास करून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. तब्बल पाच हजार गाड्यांच्या ताफ्यासह आलेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे आझाद मैदान भगव्या रंगाने दुमदुमले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मुंबईत ठिकठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने एकत्र झाले आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे ‘मराठे, मराठे’चे घोषणा, भगवे झेंडे आणि मराठा समाजाचा उत्साह असे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा यावेळी मराठा नेत्यांकडून देण्यात आला.

Maratha Aarkshan,मुंबई

उपोषण सुरू करताच पाटलांनी दिले 10 संदेश…

  • – समाज आपल्यावर आशा ठेऊन आहे कि लढायला गेलेली पोरं आरक्षण घेऊन येतील
  • – समाज प्रत्येक मिनिटाला आपली खबर घेत आहे
  • – आंदोलनात कोणीही व्यसन करू नये
  • – आंदोलनात अपप्रकार करून समाजाची मान खाली घालू नका. गडबड गोंधळ करू नका
  • – मराठ्यांनी फक्त दोन तासात मुंबई बंद करून दाखवली
  • – आंदोलकांनी वाहने पार्किंगमध्ये लावावीत व वाहनाजवळ विश्रांती घेऊन आझाद मैदानाकडे येत राहावे
  • – अधिकृत पार्किंगवर वाहने लावावीत. तिथून रेल्वेने ५-१० रुपयांत तुम्ही आझाद मैदानात येऊ शकता
  • – सरकार आडमुठ्या सारखे वागले तर मी बघतो
  • – आता सरकारने गोळ्या घातल्या तरी मी हटणार नाही
  • – आरक्षण घेतल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

1 thought on “Maratha Aarkshan: दिसेल तिथे भगवा; काय चाललंय मुंबईत? उपोषण सुरू करताच पाटलांनी दिले 10 संदेश”

Leave a Comment