मराठी जनतेचा अपमान?
मुंबई | प्रतिनिधी
Maharashtra: उत्तर प्रदेशचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत वादग्रस्त विधान केले आहे. “अगर आप बहुत बड़े बॉस हो तो चलो यूपी-बिहार, पटक पटक के मारेंगे,” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील मराठी अस्मिता आणि भाषिक भावना चिघळवल्या आहेत.
दुबे म्हणाले, “तुम्ही उत्तर भारतीयांवर टीका करता, पण महाराष्ट्र आमच्या पैशावर चालतो.” या विधानामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
राजकीय प्रतिक्रिया
- रोहित पवार (राष्ट्रवादी): “दुबे यांनी महाराष्ट्रात येऊन चर्चेला सामोरे जावे.”
- वसंत मोरे (मनसे): “मराठी अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही.”
- प्रताप सरनाईक (शिंदे गट): “मराठी भावना केवळ मतांसाठी वापरल्या जातात.”
समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया
‘मराठी अस्मिता’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गाजत आहे. लोकांनी दुबे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी निषेध मोर्च्यांचे आयोजन सुरू झाले आहे.