Maharashtra: ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024’ हे लोकशाहीविरोधी आणि घटना विरोधी विधेयक राज्यातील भाजपा – महायुती सरकारने बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले आहे. पाशवी बहुमताचा वापर करून सरकार जनतेचा आवाज दाबत आहे. लोकशाहीवर घाला घालणाऱ्या या कायद्याच्या माध्यमातून फडणवीस सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, अशी प्रखर टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे यांनी केली आहे.

या विधेयकाविरोधात नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्षांसह अन्य डावे पक्ष, विविध जनसंघटनांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात आले होते. मकोका, युएपीए, भारतीय न्याय संहीता यांसारखे कायदे आधीपासून अस्तित्वात असताना, वेगळ्या जनसुरक्षा कायद्याची आवश्यकता नाही, असा ठाम मुद्दा यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
या विधेयकाविरोधात १२,००० पेक्षा अधिक हरकती प्राप्त झाल्या असूनही, सरकारने त्या दुर्लक्षित करत कायदा मंजूर केला आहे. या कायद्याचा दुरुपयोग होण्याची दाट शक्यता असून, डाव्या, जनवादी शक्तींना दाबण्यासाठी आणि लोकविरोधाचा आवाज दडपण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे.
या कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यभरात जनजागृती करून, सरकारविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा कॉम्रेड सुभाष लांडे यांनी दिला आहे.
हे हि वाचा : Shevgav: केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात शेवगावमध्ये मोर्चा; आयटक, किसान सभा, आशा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सहभाग
1 thought on “Maharashtra: 12 हजार हरकती झुगारून, कायदा लादणं म्हणजे लोकशाही व्यवस्थेची हत्या- कॉ. सुभाष लांडे; जनसुरक्षा नव्हे, ही जनअधिकारांवर गदा”