Maharashtra flood relief: अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 3258 कोटी 56 लाख निधी वितरित; पुण्यात ई-केवायसी अभावी मदतनिधी रखडला

Photo of author

By Dipak Shirsath

 

Maharashtra flood relief,निधी वितरित,अतिवृष्टी,

मुंबई | प्रतिनिधी

Maharashtra flood relief: राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित २३ जिल्ह्यातील ३३,६५,५४४ शेतकऱ्यांच्या २७,५९,७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी मदतीसाठी शासनाने ₹३,२५८.५६ कोटी निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. ही माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी जाहीर केली.

मंत्री मकरंद पाटील यांच्या माहितीनुसार, या खरीप हंगामात आतापर्यंत पूरग्रस्तांना एकूण ₹७,५०० कोटी (सुमारे) मदत वितरण केली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजपैकी ₹१,३५६ कोटीची मदत कालच वितरित करण्यात आली.

ई-केवायसीत हलगर्जी केल्यास मदतीला मुकणार शेतकरी

एप्रिल व मे महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी व फळपिकांची मोठी हानी झाली होती. नंतर सरकारने एप्रिल व मे महिन्यांची एकत्रित भरपाई मंजूर केली आहे. या लाभार्थ्यांना मदतीसाठी ई-केवायसी (E-KYC) करणे अनिवार्य केले आहे. लाभार्थ्यांच्या माहितीत त्रुटी असल्यास किंवा ई-केवायसी न झाल्यास मदत मिळणे अडचणीचे होणार आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित ई-केवायसी करावी असा सल्ला देण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य

पुण्यातील स्थिती

पुणे जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यांच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याप्रमाणे अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. एकूण ४७,४२४ मंजूर लाभार्थ्यांपैकी ४०,९८६ लाभार्थ्यांना पात्र ठरवण्यात आले आहे.

परंतु ३०,०८९ लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी न केल्याने ₹२६.९२ कोटी (मंजूर) मदत Pune मध्ये रुकली आहे. जिल्हा प्रशासनाने त्वरित ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारी आकडे

संपूर्ण राज्यात पूरग्रस्तांना आतापर्यंत विविध टप्प्यांत मदतीचे वितरण सुरू आहे. या पॅकेजचा उद्देश तातडीने नुकसान भरपाई करणे व पुनर्वसनास मदत करणे हा आहे.

विभागनिहाय निधी पहा

विभागनिहाय वितरित निधी (कोटीमध्ये)

विभागशेतकरीक्षेत्र (हेक्टर)निधी (कोटीमध्ये)
नागपूर३,७६,९६८३,४४,६२९.३४३४०.९०
अमरावती४,७८,९०९५,२६,३८१.३६४६३.८३
पुणे८,२५,१८९७,०९,२०९.१५९५१.६३
नाशिक१५,७९,२३९११,५०,३०१.७६१४७४.८४
कोकण१,०५,२३९२९,२३३.१६२८.१०

हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group