अहिल्यानगर | प्रतिनिधी
Laxman Hake car attack bail granted: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गोरख दळवी, संभाजी सप्रे आणि गणेश होळकर या तिघांना शुक्रवार, ता. १० ऑक्टोबर रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
ओबीसी नेते हाके हे अहिल्यानगरमध्ये सभेला जात असताना त्यांच्या वाहनावर तिघांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर नगर तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
ही घटना राज्यभरात गाजली होती. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केला. त्यांच्या वतीने ॲड. महेश तवले आणि ॲड. योगेश नेमाणे यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. संजय वाल्हेकर, ॲड. महेश शेडाळे आणि ॲड. अनुराधा येवले यांनी सहाय्य केले.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


