मुंबई | प्रतिनिधी
Ladki Bahin Yojna: राज्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अखेर सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. वित्त विभागानं ४१०.३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, या निधीतून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
मात्र, हा निधी देण्यासाठी वित्त विभागानं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला आहे. विशेष म्हणजे हा निधी मूळतः अनुसूचित जाती घटकांच्या योजनांसाठी राखीव होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जारी केला आहे.
या निर्णयाबाबत माहिती देताना राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या,
“सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींना हप्ता मिळावा, यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो. विभागाने निधी मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे. निधी मिळताच त्वरित वितरण प्रक्रिया सुरू केली जाईल.”
तटकरे पुढे म्हणाल्या, “राज्यात सध्या काही भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी नुकसानभरपाई देण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, दिवाळीपूर्वी हप्ता वितरित होईल, अशी आमची अपेक्षा आहे.”
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना मानली जाते. योजनेत दरमहा महिलांच्या खात्यात १५०० रु आर्थिक मदत जमा केली जाते.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा



खूप भारी लाडक्या बहिणीसाठी ही बातमी आहे.