मुंबई | प्रतिनिधी
Ladki Bahin yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा ‘सन्मान निधी’ वितरित करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा निधी जमा होणार असून, महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने ही योजना अखंडपणे पुढे सरकत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या विश्वासावर आधारित असलेली ही योजना आज राज्यातील महिला सक्षमीकरणाची एक अखंड क्रांती ठरत आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा लाभ हजारो महिलांपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, योजनेचा सातत्याने लाभ मिळत राहावा यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाभार्थींनी 18 नोव्हेंबरपूर्वी ही E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित… pic.twitter.com/Snf9kgFcvR
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) November 3, 2025
ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबरोबरच त्यांच्या आत्मसन्मानाला बळकटी देणारी ठरत असून, राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना नवे बळ मिळत आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


