
अहमदनगर | प्रतिनिधी
Jalsamadhi Andolan: जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक आंदोलन करण्यात आलं. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी 1982 पेन्शन योजना लागू करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने सादर केलेल्या सकारात्मक शपथपत्राची प्रत तात्काळ द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सचिव महेंद्र हिंगे यांनी केले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर सरकारने तात्काळ दखल घेतली नाही तर राज्यभरातील 26 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जलसमाधी आंदोलन छेडणार आहेत.”
या निदर्शनात कोअर कमिटीचे अनेक सदस्य, शिक्षण संघटना पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले.
दरम्यान, शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना “शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे”, अशी माहिती दिली असली तरी शपथपत्राची मूळ प्रत अद्याप संघटनेला देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि उत्सुकता आहे.
या आंदोलनात जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, कार्याध्यक्ष सुनील दानवे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, बाबासाहेब शिंदे, बद्रीनाथ शिंदे, राजू पठाण, किशोर झावरे, बापू झेंडे, कारभारी आवारे, देविदास दळवी, दिलीप रोकडे, जयमाला भोर, मिठू काळे, शाहिदा सय्यद, समीना शेख, वैभव सांगळे, एम.व्ही. वाघमारे, आफताब शेख, समद शेख, इमरान शेख, जमीर शेख आदी सहभागी झाले होते.
हे हि वाचा : Politics: नरेंद्र मोदींचा 75 वा वाढदिवस; भागवतांचे विधान आणि राऊतांचा टोला