India: 9 जुलै भारत बंदची हाक; काय सुरू काय बंद? 25 कोटी कामगार होणार सहभागी

Photo of author

By Dipak Shirsath

 

नवी दिल्ली | प्रतिनिधी

India: ९ जुलै २०२५ रोजी देशभरात मोठ्या प्रमाणावर भारत बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी या बंदची हाक दिली आहे. यामध्ये २५ कोटींपेक्षा अधिक कामगारांच्या सहभागाची शक्यता असून, देशभरात अनेक महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

कोणत्या संघटनांचा सहभाग?

  • अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) 
  • भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)
  • भारतीय ट्रेड युनियन केंद्र (CITU)
  • हिंदू मजदूर सभा
  • स्वनियोजित महिला संघ
  • लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन
  • युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस

यासोबतच संयुक्त किसान मोर्चा, ग्रामीण कर्मचारी संघ आणि स्टील, एनएमडीसी, रेल्वे क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.

भारत बंद, India, कामगार,

❌ कोणत्या सेवा बंद राहतील?

  • बँकिंग सेवा
  • विमा कंपन्यांची कामे
  • पोस्ट ऑफिस
  • कोळसा खाणी
  • राज्य परिवहन सेवा
  • महामार्ग व रस्ते बांधकाम
  • सरकारी उद्योगांचे उत्पादन

✅ कोणत्या सेवा सुरू राहतील?

  • खासगी क्षेत्रातील बहुतांश कंपन्या
  • रुग्णालये व वैद्यकीय आपत्कालीन सेवा
  • खासगी शाळा, महाविद्यालये व ऑनलाईन शिक्षण

बंद मागचं कारण काय?

संघटनांचा आरोप आहे की, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मजुरांचे अधिकार कमी होत आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मजुरांना नाडले जात आहे. यामुळे देशातील सर्वसामान्यांमध्ये संताप आहे.

नागरिकांनी गरजेच्या सेवा पूर्वीच पार पाडाव्यात. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, मात्र सरकारी सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group