जागतिक अंध दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
अहमदनगर | प्रतिनिधी
Free Eye Check-up camp: फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक अंध दिनानिमित्त शुक्रवार, ता. 10 ऑक्टोबर 2025 रोजी मोफत नेत्रतपासणी तसेच मोतीबिंदू, काचबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत होणार असल्याची माहिती फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.
या शिबिरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येईल. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांच्यावर पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व गरजू रुग्णांनी नावे नोंदवून अधिक माहितीसाठी जालिंदर बोरुडे (मो. 9881810333) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


