Facebook fake news: फेसबुकवरील ‘गोपनीयता नोटीस’ पोस्ट अफवा; कॉपी-पेस्टने नियम बदलत नाहीत

Photo of author

By Dipak Shirsath

Facebook fake news, गोपनीयता,

Facebook fake news: फेसबुक किंवा मेटाने वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहिती व फोटो वापरण्याबाबत नवीन नियम लागू केल्याचा दावा करणारी आणि “मी फेसबुकला परवानगी देत नाही” अशी मजकूर असलेली कॉपी-पेस्ट पोस्ट गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र ही पोस्ट पूर्णपणे खोटी असून अशा पोस्ट केल्याने कोणतेही कायदेशीर किंवा तांत्रिक बदल होत नाहीत, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

 

फेसबुकचे नियम (Terms of Service) आणि गोपनीयता धोरण (Privacy Policy) वापरकर्ता खाते तयार करताना स्वीकारलेले असतात. या नियमांमध्ये कोणताही बदल झाल्यास कंपनीकडून अधिकृत नोटीस, ईमेल किंवा ॲपमधील सूचना देण्यात येतात. अशा प्रकारची कॉपी-पेस्ट पोस्ट करून नियम बदलू शकतात, हा समज चुकीचा आहे.

 

तज्ज्ञांच्या मते, २०१२ पासून “Facebook Privacy Notice hoax” नावाने अशा अफवा विविध भाषांमध्ये सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. या पोस्टमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि चुकीची माहिती पसरते.

 

दरम्यान, सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी वापरकर्त्यांना त्यांच्या फेसबुक Privacy Settings तपासण्याचा, दोन-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवण्याचा आणि अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, असा सल्ला दिला आहे. तसेच, खरी माहिती मिळवण्यासाठी नेहमी फेसबुकच्या अधिकृत वेबसाईट किंवा पेजवरूनच पडताळणी करावी, असेही त्यांनी आवाहन केले.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Leave a Comment