अहमदनगर | २८ जून | प्रतिनिधी
(education) सावेडी गुलमोहर रोड येथील आनंद माध्यमिक विद्यालय दहावीचा निकाल यंदा शंभर टक्के लागला असून, या यशस्वी निकालानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संस्थेच्या वतीने उत्साहात पार पडला.
(education) या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए. ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आनंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव किसन तरटे, विश्वस्त विश्वनाथ पोखरकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अरविंद अष्टेकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर तसेच अपर्णा क्षीरसागर, सीमा सोले, कविता पानसरे, शर्मिला कुलकर्णी, विठ्ठल बोडखे, पुजाराम पवार, लक्ष्मण जाधव, विकास घोलप, लीना घसे, वैशाली कुलकर्णी, अनिता तारडे, सुहास बोरुडे, ज्योती सब्बन, विठ्ठल म्हस्के, वैशाली येवले, अनिता कोरडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(education) कार्यक्रमात बोलताना ज्ञानेश्वर काळे म्हणाले, “शाळेच्या शिक्षकांचा मेहनतीचा परिणाम म्हणून हा शंभर टक्के निकाल मिळवता आला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळ, सांस्कृतिक क्षेत्रातही उत्तुंग भरारी घ्यावी. गुरुजन व पालकांचा आदर राखत आपल्या यशाने शाळेचं नाव उज्वल करावं.”
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पुढील विद्यार्थ्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला: विराज रणसिंग – ९८.८०%, अस्मिता पालवे – ९७%, तन्मय पाडळे – ९६.८०%, श्वेता त्रिंबके – ९५.२०% नम्रता चव्हाण, ज्ञानेश्वरी शिरोदे, आसावरी गुणे, तस्मिया शेख, सबुरी त्रिंबके, हर्षल भांड, पुष्कर शिनगारे, मयुरी आढाव यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हजारे सर आणि लबडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिता कोरडे यांनी केले.
हे हि वाचा : २१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन : भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव