अहिल्यानगर | प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कृषी विभागाने ‘ई-पीक पाहणी’ (Digital Crop Survey – DCS) नोंदणीसाठीची अंतिम मुदत ता. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
अवकाळी पाऊस, पूरसदृश परिस्थिती आणि काही भागांत दुबार पेरणी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अपूर्ण राहिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने ही मुदतवाढ दिली आहे.
📊 नोंदणीचा आढावा:
आतापर्यंत राज्यातील ३६.१२% plots ची पीक नोंद पूर्ण झाली आहे.
उर्वरित शेतकऱ्यांनी तत्काळ नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
ही नोंदणी DCS मोबाईल ॲपद्वारे केली जात असून, पीक पाहणी पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक विमा आणि कर्जाच्या लाभांपासून वंचित राहावे लागणार नाही.
राज्य प्रशासनाने ई-पीक पाहणी प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी सहाय्यक केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत.
नोंदणीची मुदत: ता. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत.
अपूर्ण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना संधी.
जिल्हा प्रशासन सक्रिय – ई-पीक पाहणी प्रक्रियेला गती.
कृषि विभागाने सर्व तहसील व तालुका कार्यालयांना सूचित केले आहे की, शेवटच्या मुदतीपूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. शेतीशी संबंधित लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


