Cultural: 50 वर्षांची परंपरा लाभलेली पारंपरिक लक्ष्मीआई यात्रा: संबळ, हलगी, ढोल-ताशांच्या निनादात पोतराजांनी स्वतःवर ओढले आसूडांचे फटके

Photo of author

By Dipak Shirsath

Cultural, लक्ष्मीआई यात्रा
रामवाडी लक्ष्मीआई यात्रा 2025 मध्ये ढोल-ताशांच्या गजरात सहभागी पोतराज व महिला भक्त

अहमदनगर | प्रतिनिधी

Cultural: शहरातील रामवाडी येथे पारंपरिक भक्तीभावाने आणि उत्साहात लक्ष्मीआई यात्रा उत्सव साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात धार्मिक आणि सांस्कृतिक विविध उपक्रम राबविण्यात आले.

Cultural, लक्ष्मीआई यात्रा
रामवाडी लक्ष्मीआई यात्रा 2025 मध्ये ढोल-ताशांच्या गजरात सहभागी पोतराज व महिला भक्त

रामवाडी परिसरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांच्या गजरात उंट, घोड्यांच्या बग्गीत लक्ष्मीमातेची मूर्ती, कलशधारी महिला आणि पोतराज सहभागी झाले होते. भंडाऱ्याची उधळण करत, “लक्ष्मीमाता की जय!” अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.

ही यात्रा ५० वर्षांची परंपरा लाभलेली असून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाही युवकांनी प्रवरा संगम येथून कावडीने आणलेले जल देवीच्या मूर्तीला अभिषेक म्हणून अर्पण केले. विधीवत पूजनानंतर लक्ष्मी मातेच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक शहरातून पार पडली.
सांबळ, हलगी, ढोल आणि ताशांच्या निनादात पोतराजांनी स्वतःवर आसूडांचे फटके ओढत भक्तिभाव व्यक्त केला. “चट्ट… चट्ट…” अशा आसूडांच्या आवाजाने वातावरण भारावून गेले. माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी पोतराजाचा साज चढवून देवीला अभिवादन केले.
Cultural, लक्ष्मीआई यात्रा
रामवाडी लक्ष्मीआई यात्रा 2025 मध्ये ढोल-ताशांच्या गजरात सहभागी पोतराज व महिला भक्त

मिरवणुकीत पोतराज म्हणून बबन लोखंडे, लखन लोखंडे, ऋतिक शेलकर, पवन शेलकर, तर वाजंत्री म्हणून विशाल वैरागर, शाम साबळे, यादव खुडे यांचा सहभाग होता. महिला भक्तांनी डोक्यावर कलश घेऊन, कपाळी गंध लावून सहभाग नोंदवला.

ही शोभायात्रा कोठला, मंगलगेट, सर्जेपूरा, रंगभवन मार्गे रामवाडीकडे मार्गक्रमण करून भक्तिरसात समारोपास आली.

 

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

 

Leave a Comment