Mla shivajirav kardile nidhan: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डीले (वय ६६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पहाटे अचानक तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना तात्काळ साईदीप रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कर्डीले हे नगर जिल्ह्यातील ओळखले जाणारे प्रभावी नेते होते. त्यांनी भाजपच्या संघटनात्मक कामात तसेच स्थानिक विकासकामांत मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या अचानक निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनेक नेत्यांनी सामाजिक माध्यमांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे नगर जिल्हा भाजपला मोठी हानी झाल्याची भावना कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर आज दुपारी ३ वाजता बुऱ्हाणनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.